संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

चाकूर (प्रतिनिधी) : चाकूर तालुक्यातील झरी बु. येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष विठ्ठलराव घायाळ, प्रमुख पाहुणे झरी गावचे सरपंच अजितदादा खंदारे, माजी सरपंच दयानंद भाऊ सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक ठाणे मुंबई ओम वंगाटे, राहुल भैया सुरवसे, दशरथ भंडे, संजय पाटील, नागनाथ पाटील, आबाजी सुरवसे, नागनाथ सुरवसे, लक्ष्मण घायाळ, गोविंद घायाळ, जयपाल घायाळ, महादेव घायाळ, अमोल घायाळ, नामदेव घायाळ, संभाजी घायाळ, ज्ञानेश्वर घायाळ, नितीन वाघमारे, लहू सुरवसे, कृष्णा घायाळ, राम घायाळ, गितेश डोंगरे, फिरोज सय्यद, गिरजाप्पा घायाळ, केशव घायाळ, ओम सुरवसे, ईश्वर घायाळ, इनुस शेख, अंबादास घायाळ, गजानन घायाळ, नागनाथ बामणे, भिवाजी बामणे, कृष्णा वाघमारे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाप्रसंगी दयानंद भाऊ सुरवसे, बालाजी मेंनचक्रे, प्रा. मारुती बुद्रुक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्‍मण घायाळ यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!