लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार – आ. धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
धीरज देशमुख यांच्या हस्ते जळकोट येथे बिनव्याजी कर्ज वाटपाचा शुभारंभ
जळकोट (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा बँक शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची आहे. या बँकेच्या माध्यमातून सेवाभावी पद्धतीने काम सुरू आहे. पूर्वी शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचे कर्ज मिळायचे परंतु यामधून शेतकरी काहीही करू शकत नव्हता, शेतकऱ्यांचे कुटुंब कर्जबाजारीपणामुळे उद्ध्वस्त झाले. नियमाच्या अडचणी त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. यानंतर सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात आले. यानंतर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. आता यापुढे जाऊन लातूर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे व याचे वाटप देखील सुरू झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आपली सेवा करत राहील, येणाऱ्या काळात लातूर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी जळकोट येथे शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपनगराध्यक्ष मन्मथ किडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक पृथ्वीराज शिरसाट, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मारुती पांडे, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, काँग्रेसचे माध्यम जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, जळकोट च्या नगराध्यक्ष प्रभावती कांबळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, माजी संचालिका शीलाताई पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, माजी चेअरमन गणपत धुळशेट्टे, बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, राष्ट्रवादीचे गटनेते धोंडूतात्या पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना चेअरमन धीरज देशमुख म्हणाले की लातूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी घडलेली संस्था आहे. सध्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य व अर्थ पुरवठा सुलभ पद्धतीने होत आहे. प्रत्येक सोसायटीने कर्जमर्यादा एक एक कोटी रुपये वाढवली तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 500 कोटीची उलाढाल होईल. जिल्हा बँकेची एक कामधेनु आहे आपण या कामधेनु पासून किती लाभ घेतो यांच्यासोबतच लाभ घेताना कामधेनू ला चारा पाणी देणे देखील महत्त्वाचे आहे असे सांगून घेतलेले कर्ज वेळेवर परत करावे, घेतलेले कर्ज योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही यासोबतच बँकेला देखील अडचण होणार नाही. जळकोट तालुक्यात बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या गावातील रस्ते लहान आहेत अशा ठिकाणी छोट्या गाड्या मधून देखील बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी तसेच नागरिकांना बँकेच्या बाहेर तासन्तास थांबण्याची गरज नाही. शेतकरी कधीही कर्ज बुडवत नाही. कोण बुडवत आहेत ते पाहणे गरजेचे आहे. काही मूठभर लोक अर्थकारण आपल्या हातात घेत आहेत यामुळे याचा फटका आज सर्वसामान्यांना बसत आहे.
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून उदगीर येथे सर्वात मोठी दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. परंतु कालांतराने हा बंद पडला. हा दूध भुकटी प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. असे सांगून जळकोट तालुक्यामध्ये बॅरेजेस व्हावेत यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले. साहेब मुख्यमंत्री असताना जळकोट ला बॅरेजेस मंजूर झाले. आता पालक मंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून लवकरच तिरु नदीवर हे बॅरेजेस उभा राहणार आहेत. यामुळे ालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेस हा हाथ आम आदमी के साथ
आमदार धीरज देशमुख त्यांनी कॉंग्रेस का हात आम आदमी के साथ असे म्हणून काँग्रेस पक्षच तळागाळातील लोकांसाठी काम करतो. आज देशामध्ये युवकांना नोकरी नाही, उद्योग बंद पडत आहेत, युवक बेरोजगार बनत आहेत जेवढे शिक्षण झाले आहे त्यापेक्षा कमी शिक्षणाची नोकरी युवकांना करावी लागत आहे. परंतु युवकांना घाबरू नका जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या सोबत आहे. असे सांगून जळकोट तालुक्यातील कर्जाची वसुली सरासरी 96 टक्के इतकी आहे ही जिल्ह्यात सर्वाधिक आहे याबद्दल जळकोट तालुक्यातील शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच धोरणाच्या काळात घरपोच सेवा देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक आहे. असे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी लातूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी लातूर जिल्हा ही एकमेव बँक आहे. ही बँक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. रेशीम उद्योगाला, पॉलिहाऊस तसेच ग्रीन हाऊस या योजना बँकेच्या माध्यमातून राबविल्या आहेत.लातूर जिल्ह्यात 7 साखर कारखाने सक्षमपणे सुरू आहेत. सर्वात जास्त गाळप या कारखान्याचे झाले आहे. असे सांगून शेतकऱ्यांनी जोडधंदा कडे वळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक संदीप डांगे, गोविद भ्रमना, संजय देशमुख, नागनाथ धुळशेट्टे, युवकचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, रमेश धर्माधिकारी, संग्राम कांबळे, गोविंद कोकणे, मेहताब बेग, नुर पठाण, व्यंकट पवार यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, बँकेचे संचालक मारुती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अर्जुन आगलावे, शिवसेनेचे टाले, शीलाताई पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव वाघमारे यांनी केले तर आभार दत्ता पवार यांनी मानले.