खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करा; अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करा; अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

अहमदपूर (गोविंद काळे) : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील एक युवक काही दिवसापुर्वी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती परंतु त्या बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह हाळी हंडरगुळी येथील तिरु प्रकल्पात आढळल्याची घटना सोमवारी दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली होती पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते दरम्यान , आपल्या मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत प्रकल्पात फेकून दिले असल्याची फिर्याद पित्याने दिली असल्यामुळे याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आला होता परंतु त्यातील काही आरोपींना अजुन अटक करण्यात आली नसल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांच्या कार्यालयासमोर दि १८ फेब्रु रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की, पांडुरंग बाजीराव दापके ( ६५ , रा . हंडरगुळी , ता . उदगीर , जि . लातूर ) यांचा मुलगा गणेश ( वय २७ ) गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता . १ फेब्रुवारी त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वाढवणा पोलीस ठाण्यात दिली होती . त्या अनुषंगाने तपास चालू असताना उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरू प्रकल्पात सदरील तरूणाचा मृतदेह दि ७ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता व सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्यातील काही आरोपींना अद्यापही अटक केली नसल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी मृताचे नातेवाईक रा तिर्थ ता अहमदपूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांना निवेदन दिले आहे की मी, रामचंद्र रंगराव पेड वय ७० वर्ष रा.तिर्थ ता . अहमदपूर येथील रहिवासी आहे माझी लहान बहिण सत्यभामा भ्र . पांडूरंग दापके राहणार हाळी हंडरगुळी यांचा मुलगा गणेश पांडूरंग दापके हा दि . ३१ जानेवारी पासून बेपत्ता होता त्यापूर्वी आरोपी विजय शिवाजी हंगरगे यांचेशी त्याचे भांडण झाले होते. त्याबबात पांडूरंग दापके यांनी पोलिस ठाणे वाढवणा येथे तक्रार दिली असताना सपो.नि पठान यांनी गुन्हा दाखल करून तपास न करता मिसिंग दाखल केली व आरोपीना मोकाट सोडले त्यानंतर द ७ फेब्रुवारी रोजी माझा भाच्चा गणेश दापके याचे प्रेत हंडरगुळी येथील तेरू प्रकल्पातिल पाण्यात मिळून आले . त्यावेळी दि ८ फेब्रुवारी रोजी आरोपी क्र .१ विजय शिवाजी हंगरगे २. बालाजी शिवाजी हंगरगे , ३. सुभाष गोविंद हंगरगे ४. संतोष गोविंद हंगरगे ५. त्र्यंबक दिगंबर घोगरे यासह विजय हंगरगे याचा साडू बाळू ( रा . घोणसी , ता . जळकोट ) या ६ जणांविरुद्ध मंगळवारी ( दि . ८ फेब्रवारी) गुरनं . २१ / २०२२ कलम ३०२ , ३६४ , १४३ , २०१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी नं १ विजय हंगरगे २.बालाजी हंगरगे दोघेही राहणार हंडरगुळी यांना आमचे समक्ष पोलीस ठाणे वाढवणा येथे ताब्यात घेऊन अटक पंचनाम्या वर अजित दापके व सतीश दापके यांच्या सह्या घेतल्या व त्यानंतर आम्ही घरी गेल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवणा यांनी आरोपी सोबत साठ गाठ करून आरोपी बालाजी हंगरगे यांना सोडून दिले आहे तसेच इतर आरोपी बाबत आज पर्यंत काही तपास केला गेला नाही हा गुन्हा आरोपीने खूपच निर्दयी पणाने संगणमत करून मागील भांडणाच्या कुरापती वरून मयतास किडनॅप करून हत्या केली आहे मयत हा त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यामुळे मयताचे आई वडील शोक ग्रस्त होऊन आज मरणाच्या दाढेत सापडलेले आहेत असे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पठान हे जाणीवपूर्वक तपास कामात विलंब करीत आहेत करिता सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांना त्यांनी कामात कुचराई करून अक्षम्य गुन्हा केला आहे म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास दुसऱ्या सक्षम अधिकार्‍याकडे देण्यात यावा व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा मी मयत मुलाचे आई-वडील व माझे इतर ५० ते १०० नातेवाईकांसह दिनांक १८ फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अहमदपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर रामचंद्र पेड, पांडूरंग दापके, सत्यभामा दापके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author