महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल कुलगुरू डॉ.उद्धव भोसलेंनी व्यक्त केले समाधान

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल कुलगुरू डॉ.उद्धव भोसलेंनी व्यक्त केले समाधान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी महाविद्यालयास व विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन व महाविद्यालयाने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सध्या विद्यापीठाच्या ‘हिवाळी २०२१’ च्या परीक्षा चालू असून महाविद्यालयातील परीक्षा दालनात, परीक्षा कार्यालयात जाऊन पाहणी केली. व परीक्षा सुरळीत व कोव्हिड १९चे पालन करून चालू असलेल्या पाहून समाधान व्यक्त करून विद्यापीठाच्या परीक्षेच्या अडिअडचणी बद्दल चर्चा केली. तसेच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती बद्दल कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पहाणी करून समाधान व कौतुक केले. कुलगुरूंच्या या भेटीमुळे सर्व महाविद्यालय परिसरात व प्राध्यापकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मध्ये महाविद्यालयाच्या विविध आठ विभागाने घेतलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रकाशित करण्यात आलेले शोधनिबंध ग्रंथ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी कुलगुरूनां भेट दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालय अधिक्षक प्रशांत डोंगळीकर, प्रो. डॉ. अनिल मुंढे, प्रा. डॉ. सतीश ससाणे, प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर, प्रा. डॉ. मारोती कसाब, डॉ.बी.के. मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा. अतिश आकडे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. डी. एन. माने डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी आदिंची उपस्थिती होती.

About The Author