संत रविदासांच्या समतावादी विचारांची भारताला गरज – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

संत रविदासांच्या समतावादी विचारांची भारताला गरज - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) ऐसा चाहू राज मै जहां मिले सबन को अन्न छोटा बडा सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न अशा ओळी लिहून भारतभर समतेची अध्यात्मिक चळवळ चालविणाऱ्या संत रविदास यांच्या विचारांची देशाला आज आवश्यकता असून, त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संत रविदास जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर यावेळी प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.डी. डी. चौधरी यांची होती . पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मध्ययुगीन काळात भारतभर ज्या भक्ती चळवळी सुरू होत्या, त्यापैकी रविदासांची चळवळ संपूर्ण जगाला प्रेम, अहिंसा शिकविणारी होती. म्हणूनच त्यांचा अनुयायी वर्ग संपूर्ण जगामध्ये दिसून येतो. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी कोविड -१९च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!