शिवशाहीर सुरेश जाधव त्यांच्या प्रबोधनाचा आदर्श घ्यावा: ज्योती एकुर्केकर (कांबळे)

शिवशाहीर सुरेश जाधव त्यांच्या प्रबोधनाचा आदर्श घ्यावा: ज्योती एकुर्केकर (कांबळे)

उदगीर (प्रतिनिधी) : शिवशाहीर, प्रबोधनकार सुरेश जाधव यांनी सामाजिक जाणीवा जपत समाज प्रबोधनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जपणूक व्हावी. आणि नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा. असे विचार ज्योती कांबळे एकुर्केकर यांनी व्यक्त केले
त्या उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवशाहीर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुरेश जाधव यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, मादलापुरचे सरपंच उदय मुंडकर, धनाजी मुळे, मनोज पुदाले, नवनाथ गायकवाड, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पटोद ,नितीन पाटील, यशवंत पाटील, श्याम डावले, गजानन सातालकर, मदन पाटील, सतीश पाटील मानकीकर, उत्तरा ताई कलबुर्गे, उषाताई कांबळे ,बबिता भोसले ,नीता मोरे, अनिता जगताप ,सरोजा वारकरे, अनिता बिरादार ,गोपाळ पाटील, आनंद भोसले, अनिता बिरादार, अभिजीत माळवदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ज्योती कांबळे म्हणाल्या की, शिवजयंती साजरी करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श राज्यकारभाराची जाण ठेवून प्रत्येकानी नैतिकता आणि स्त्रियांचा सन्मान करावा,स्त्री दाक्षिन्याला प्राधान्य द्यावे. असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उदगीर शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author