सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी उत्सव गरजेचे : निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी उत्सव गरजेचे : निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

उदगीर (प्रतिनिधी) : समाजामध्ये सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे ,(सोनकांबळे) यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील सुप्रसिद्ध दर्गा हजरत पिर मुसा साहब रहमतुल्ला आलाय पिर मुसा नगर येथील उरूस (जत्रा) निमित्त दर्ग्यास चादर अर्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी उदगीरचे विकासरत्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे तसेच उदगीर नगर परिषदेच्या प्रभाग 9 येथील ॲड वर्षा पंकज कांबळे, प्रभाग क्रमांक 10 चे आयाज जागीरदार, बंटी घोरपडे, प्रभाग क्रमांक सातचे रवी काशिनाथ जवळे, शेख याकुब मेहबूब प्रभात तेरा चे नर्सिंग शिंदे, प्रभाग क्रमांक 14 च्या सुष्मिता ताई माने, प्रभाग क्रमांक 14 च्या ज्योती ताई बालाजी डोंगरे यांच्यासह उदगीर शहरातील नागरिक आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उत्सुक असलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author