शेतकर्याच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी भाग पाडू – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र वाढलेले असल्यामुळे ऊसाचे लागवड क्षेत्रही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. परंतु कारखान्याच्या मनमानीपणामुळे शेतकरी सभासद असतानाही त्यांचा ऊस वेळेत कारखान्याला जात नाही. कारखान्याच्या फायद्यासाठी गेटकेन प्रक्रियेद्वारे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला जात आहे. त्यामध्ये सभासद व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत सहकार क्षेत्रातील कारखानदारांनी शेतकर्यांचा ऊस वेळेत घेवून जावा, शेतकर्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा अन्यथा शेतकरी हितासाठी मा.न्यायालयात दाद मागून शेतकर्याच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी भाग पाडू असे प्रतिपादन भाजपा नेते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते भाजपा किसान विकास मोर्चाच्यावतीने आयोजित महापूर व कासारगाव येथील जनसंवाद अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी महापूर येथील जनसंवाद अभियानाला चंद्रकांत भोसले, युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख, जननायक संघटणेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, लातूर तालुकाध्यक्ष महादेवराव गायकवाड, भाजपा लातूर शहर विधानसभा किसान मोर्चाचे अध्यक्ष सौदागर पवार, बब्रूवान पवार, अनंतराव माने, ग्रांमपंचायत सदस्य अजय राजे, पंडीत जाधव, हणुमंत नागराळे, श्रीधर मोरे, गोविंद आलुरे, श्रीमंत जाधव, रमेश माने, दामोदर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कासारगाव येथील जनसंवाद अभियानाला महादेवराव मोहिते, बाळासाहेब मोहिते, चतुर्भूज भंडे, पांडुरंग मामडगे, श्रीकांत मोहिते, काका भगाडे, विनोद दिवे, कमलाकर मोहिते, प्रेम मोहिते, सुनिल मोहिते, आर्वीचे उपसरपंच सचिन सुरवसे, सचिन मोहिते, नांदगावचे बळीराम ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, साखर उपायुक्त नांदेड यांच्या माहितीनुसार 2020-20 मध्ये मांजरा कारखान्याने 2300 भाव दिलेला असून त्यापैकी 475 देणे बाकी आहे. विकास ने 2300 दिला असून 399 देणे बाकी आहे. रेणानेही 2300 दिलेला असून 556 देणे बाकी आहे. हे लातूर जिल्यातील कारखानदारीचं वास्तव असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना या कारखान्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हिताचा विचार करून शेतकर्यासाठी विवेकानंद शुगर कारखान्याची उभारणी इथेनॉलसहीत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी या कार्यक्रमाला दिलीप माने, विलास महाराज, युवा सरचिटणीस संतोष ठाकूर, सागर घोडके, युवा उपाध्यक्ष पंकज देशपांडे, शंभूराजे पवार, कासारगाव येथील विक्रम मोहिते, गोविंद शिंदे, संयज मोहिते, गणेश जाधव, शिवाजी मोहिते, सूर्यकांत मोहिते, जीवन मोहिते, बाबासाहेब मोहिते, सुधाकर मोहिते, शशिकांत मोहिते तर महापूर येथील गणेश नागराळे, हणमंत जगदाळे, प्रा.सूर्यकांत पवार, प्रा.मारूती सूर्यवंशी यांच्यासह महापूर व कासारगाव येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार होणार
केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाच्या काळात 21 लाख कोटीचे पॅकेज जाहीर करून जनसामान्याला आधार देण्याचे काम केले. त्याबरोबरच तेलंगणा व दिल्ली सरकारनेही मोठी मदत देण्याचे काम केले. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने मात्र कुठलीही मदत जाहीर न करता कोरोना काळातही पी.पी.ई.किट्स व रेमडेसेवीरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचे काम केले. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मात्र अध्यात्म व शिक्षणातही मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे जगातील 13 राष्ट्रांनी मोदींचा गौरव केला. त्यामुळे यापुढील कालावधीतही मोदीजींच्या नेतृत्वाखाली 21 व्या शतकात भारत महासत्ता बनून मोदीच स्वामी विवेनंनांचे स्वप्न साकार करतील. असा विश्वासही भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला.
उजनीच्या पाण्याची वचनपूर्ती करावी अन्यथा राजीनामा द्यावा – अजितसिंह पाटील कव्हेकर
1999 ते 2022 पर्यंत कुठलेही पद किंवा सत्ता नसताना भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. परंतु विद्यमान पालकमंत्री महोदय मात्र गेल्या पंधरा वर्षापासूनही शेतकर्यांच्या मदतीला आलेले नाही किंवा अतिवृष्टीची मदत दिलेली नाही. आताही शेतकर्यांच्या हिताचा निर्णय असल्याचे कारण पुढे करून मॉल व किराणा दुकानमध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्याचा निर्णय सत्ताधारी सरकारने घेतला आहे.हे थोतांड आणि चुकीचे आहे. या सरकारच्या काळात एमपीएससी, नीट, टीईटी व आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हे तिघाटी सरकार आहे. लातूरच्या पालमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 100 दिवसात उजनीचे पाणी आणू अन्यथा राजीनामा देवू असे आश्वासन दिले होते. अडीच वर्ष झाले तरी उजनीच्या पाण्याची परिपूर्ती त्यांच्याकडून झालेली नाही. त्यामुळे त्यांनी उजनीच्या पाण्याची वचनपूर्ती करावी. अन्यथा नैतिक जबाबदारी स्वीकारून आहे त्या पदाचा राजीनामा द्यावा. असे मागणीही युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केली.