मनपा लातूर तुसी महान हो, शहर मे के खड्डे कब बुजाओगे

मनपा लातूर तुसी महान हो, शहर मे के खड्डे कब बुजाओगे

लातूर (प्रतिनिधी) : उड्डाणपूल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी व जनहित आणि प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने बोलके फलक घेऊन गांधीगिरी लातूर शहरात उड्डाणपूल या वरील रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे या रस्त्या चा वापर बाहेरून येणारे व शहरातील जनता जास्त प्रमाणात वापर होतो त्यात असलेले खड्डे ही जनतेला त्रास दायक ठरत आहेत याची दुरुस्ति मनपा करत नसल्याने जनतेत रोष होत आहे.या रस्त्याचा वापर मनपा कर्मचारी व प्रतिनिधी ही करीत असतील तरीही या कडे त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.तसेच गल्ली पासून मेन रोड प्रत्तेक ठीकानी खड्डेच खड्डे दीसून येतात याचा त्रास सर्व सामान्य जनतेस होतोच पण वाहनधारक खड्डा चूकवीन्या प्रयत्नात आपघातास समोरे जातो व शाररीक आजार मनक्याचा, पाठीचा कमरेच्या त्रासापासून नागरीक परेशान झाला आहे यात वीद्यर्थीनांही नोठा त्रास सहन करावा लागत आहे यासर्व बाबी बाबत मनपा च्या निदर्शनास आणून सुद्धा या गांभीर्य बाबीकडे दूर्लक्ष करीत प्रशासन गांभीर्यने घेत नाही खड्ड्याबाबत मनसेच्या वतीने “अँड. अजय कलशेट्टी” यांच्या नेत्रत्वात उड्डाणपूल परिसरात “मनपा लातूर तुसी महान हो, शहर मे के खड्डे कब बुजाओगे” असे बोलके फलक घेऊन मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.यावेळी अँड.शिरीष धहीवाल, अँड.सूरेश सलगरे, अँड.कल्पना भुरे, अँड. ज्योती यावलकर, शिवा धुळे, बालाजी पाटील, वैभव जाधव,अनिल जाधव, अँड.सतीश भालेराव, हुसेन पठाण, सुभाषप्पा पंचाक्षरी, राजाभाऊ बेंबळकर, विलास भूमकर, विजय वारद, मन्मथ पोपडे, शिवा रोडे, सोमनाथ खुदासे, पारस चापसी, गोपाळ खंडागळे आदी उपस्थीत होते.

About The Author