मनुष्याला जीवनात चांगल्या विचाराची भूमिका येण्याकरिता अंगी सर्वगुणसंपन्नता आली पाहिजे – जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी

मनुष्याला जीवनात चांगल्या विचाराची भूमिका येण्याकरिता अंगी सर्वगुणसंपन्नता आली पाहिजे - जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी

मुरूम (प्रतिनिधी) : मनुष्याच्या अंगी भक्ती आणि श्रद्धा असून या परिवारात कै. माधवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत त्यांचे स्वप्न साकार करण्याकरिता त्यांचे संस्कार घेऊन बसवराज पाटील व बापूराव पाटील हे बंधू या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. खरेतर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर त्यांच्यामध्ये सर्वगुणसंपन्नता आली पाहिजे असे प्रतिपादन उजैनी मठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी केले. श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता.१७) रोजी उजैनी मठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते चालू हंगामातील उत्पादित ६ लाख ६१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. विठ्ठलसाई कारखान्याला काशी पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सदिच्छा भेट देवून शुभ आशीर्वाद दिला. यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, शरणय्या स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, कारखान्याचे संचालक केशव पवार, विठ्ठलराव पाटील, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, शिवमुर्ती भांडेकर गुरुजी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, अँड. व्ही. एस. आळंगे, नगराध्यक्षा अनिता अंबर, सौ रणखांब प. स. सभापती लोहारा, माजी नगराध्यक्ष मुळे लोहारा, माजी नगराध्यक्ष रशिद शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वामीजींनी आशीर्वचनपर बोलताना पुढे म्हणाले, ज्यामध्ये साहस, धैर्य, कष्ट करण्याची उर्मी, चांगली भावना, शक्ती व चांगला दृष्टिकोन अशा वेगवेगळ्या गुण असणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने परमेश्वर देखील साथ देत असतो. या परिसरातील जनतेचे चांगले हितसंबंध राखण्याकरिता कारखाना प्रयत्नशील आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड जीवनात घालून सर्वांनी जगले पाहिजेत असे ते शेवटी म्हणाले. कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील म्हणाले की, या कारखाना परिक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील तर आभार विठ्ठलराव बदोले यांनी मानले. या परिसरातील शेतकरी, सभासद, कारखान्यातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!