नांदगाव येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
शिक्षकांनी घेतले बाला उपक्रमासह तंबाखू मुक्तीचे धडे…
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव येथे फेब्रुवारी महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शुक्रवार दि १८ रोजी उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बालाजी कोळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निव्रत्ती जाधव, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी धनराज गिते, बीआरसीचे विशेष शिक्षक किशोर शिंदे, यांची उपस्थिती होती. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर नांदगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गिताच्या माध्यमातून उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले.
शिक्षण परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम बाला या अंतर्गत लपंडाव भिंत, दरवाज्यातील कोनमापक,रीड टू मी अॅप इन्स्टालेशन तसेच सर्व शाळेला एनसीईआरटी मार्फत वितरीत इंग्रजी पेटीतील साहित्य ओळख व वापर आणि तंबाखू मुक्त शाळेसाठीचे विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान नांदगाव शाळेतून मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या सोनाजी भंडारे यांचा विचार पिठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करुन त्यांना नांदगाव केंद्राच्या वतीने निरोप देण्यात आला.यावेळी केशव गंभीरे, हिरालाल पाटिल, आप्पाराव शिंदे, नवल पाटील, सतीश सातपुते, शिवराज सोदले, अल्लाबक्ष शेख, नाना जाधव, भोई , डायट मुरुडचे अधिव्याख्याता डॉ.योगेश सुरवसे, संतोष ठाकुर, इंग्रजी विषय तज्ञ संतोष लोहारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपक्रमशिल शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख यांनी केले तर आभार कवयित्री जनाबाई घूले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीम.विजया काळे, मंगल डोंगरे, सुनिता पवार, अनारकली शेख, छाया कांबळे, प्रणिता नवगिरे, सविता जगताप, निलेश पवार, गोपाळ मुळे यांनी परिश्रम घेतले.