अठ्ठावीस वर्षात लातूरात एकही उद्योग आणलेला नाही – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर व जिल्ह्याचे राजकारण करणार्यांनी आठ वर्ष मुख्यमंत्री पद अन् वीस वर्ष मंत्री पदावर काम केले. तरीही लातूरसारख्या प्रगतशील शहरामध्ये साधा उद्योग त्यांना आणता आलेला नाही. शरदराव पवारांनी बारामती व बँगलोरच्या धर्तीवर पुण्याचा विकास करून आयटीमध्ये पुणे शहराला देशात क्रमांक एकवरती आणण्याचे काम केलेला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, तत्कालिन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आ.अभिमन्यू पवार यांनी लातूरात बोगीचा कारखाना आणून पाच हजार तरूणांना रोजगार देण्याचे काम केलेले आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु लातूरचे राजकारण करणार्या सत्ताधार्यांनी मात्र साडेआठ वर्ष मुख्यमंत्री व वीसवर्ष मंत्री पदावर काम करून लातूरकरांसाठी एकही उद्योग आणलेला नाही. त्यामुळे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते तांदूळजा व भिसेवाघोली येथे आयोजित जनसंवाद अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूभाषअप्पा गणगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा लिनेस क्लबच्या प्रांतपाल प्रतिभाताई पाटील कव्हेकर, युवा नेते तथा भाजपा युवा मोेर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, भाजपा चिटणीस बाबासाहेब देशमुख, जननायक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, माणिकराव भिसे, शिवराम कदम, शिवाजीराव भिसे, जयराम पाटील, भूजंगराव पाटील, आप्पसाहेेेब भिसे, बसूअप्पा धुमाळ, गुरूलिंग धुमाळ, रामदास गिरी महाराज, कमलाकर भिसे, माऊली मोरे, दत्तात्रय भिसे, अशोक भूजबळ, नामदेव मांडे, रामराव भिसे तर तांदूळजा येथील महादेव गायकवाड, बलभीम गायकवाड, दिलीप सराफ, प्रशांत नानजकर, रामराव जाधव, बबनराव थळकर, भरत जाजू शेठ, जग्गनाथ गायकवाड, अशोकराव कदम, बबू्रवान पवार, एम.एन.एस.बँकेचे जॉईंट एम.डी.बाळासाहेब मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, कोरोना काळात केंद्राने 21 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. कृषीच्या मुलभूत सुविधासाठी चार कोटी रूपये दिले. मोदी सरकारने शेतकर्यांच्या कल्याणासाठी वीस योजना लागू केल्या. यामध्ये शेतकर्यांना मासिक तीन हजार रूपये पेन्शन व लघु उद्योगासाठी सहा हजाराचे अनुदान देण्याचे काम केलेले आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा व दिल्ली सरकारनेही कोरोना काळात मदत केली. परंतु राज्यातील सरकारने मात्र काहीही मदत केली नाही. उलट रेमडेसेवीर व पी.पी.ई.किट्स मध्ये अपहार करण्याचे काम केलेले आहे. असे भ्रष्ट सरकार मी आजपर्यंत पाहिलेले नाही. असा आरोपही माजी आ.कव्हेकरांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार स्थानिक कमिटीच्यावतीने करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी तांदूळजा परिसरातील विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सारसा ग्रांमपंचायतीच्यावतीने कव्हेकर परिवांराचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव गायकवाड, शिवाजी भिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नवनाथ झुटे यांनी केले तर आभार अब्दूलगालीब शेख यांनी मानले.
यावेळी भिसेवाघोली येथे मसला,भोसा, वाडीवाघोली, माटेफळ येथील शेतकरी तर तांदूळजा येथील सभेला सारसा, टाकळगाव, कानडी बोरगाव, वांजरखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोलल्याशिवाय ऊसाचा प्रश्न मिटणार नाही – सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
सध्याचं सरकार त्रिकूट सरकार आहे. त्या सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे जनहिताच्या विरोधात निर्णय घेण्याचे काम शासन करीत आहे. कोरोनाच्या नावावर सर्व व्यवहार बंद करून किराणा व मॉलमध्ये दारू विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे पाप या शासनाने केलेले आहे. सध्या ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही आपला ऊस जाईल की नाही? या भीतीपोटी याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. पंरतु बोलल्याशिवाय ऊसाचा प्रश्न मिटणारही नाही. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी संघटीत होऊन ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.
जनसामान्यांचा आवाज बूलंद करण्यासाठी भाजपाच्या पाठीशी रहा – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूरचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. शेतकर्यांच्या वीजबीलांचा प्रश्न , अतिवृष्टीचा प्रश्न, पीकविम्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न असतानाही याकडे लातूरच्या पालकमंत्र्यांना लक्ष द्यायला वेळच नाही. अतिवृष्टीच्या अनुदानासाठी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन माजी पालकमंत्री तथा कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. परंतु या शेतकरी हिताच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला किंवा या आंदोलनाबाबत साधी प्रतिक्रिया द्यायलाही पालकमंत्र्याकडे वेळ नाही. सध्या ऊसाचा प्रश्न गंभीर होत आहे. तरीही सभासदांचा ऊस नेहण्याऐवजी गेटकेनद्वारे परजिल्ह्यातील ऊस आणला जात आहे आणि सभासद असणार्या शेतकर्यांचा ऊस मात्र फडातच उभा आहे. अशी वास्तव परिस्थिती आहे. लातूरचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी व जनसामान्यांचा आवाज बूलंद करण्यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे रहा असे भावनीक आवाहन भाजपा युमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
साहेब तुम्ही योग्य वेळी दौर्यामुळे जनसामान्याला आधार
शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजराव पाटील कव्हेकर यांनी 10 गट व 20 गणातून जनसंवाद अभियान सुरू केले. या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दौर्या दरम्यानच काही नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे तांदूळजा व भिसेवाघोली येथील शेतकर्यांनी साहेब, तुम्ही योग्यवेळी दौरा काढला आपल्या या जनसंवाद दौर्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला आधार मिळत आहे. तुम्ही जनसामान्यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही आवाज बूलंद करून केल्यामुळे अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लागत आहेत. अशी भावनाही उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.