धावण्याची अट रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम होमगार्डना मिळाला दिलासा!

धावण्याची अट रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम होमगार्डना मिळाला दिलासा!

पुणे (रफिक शेख) : गेल्या कित्येक दिवसापासुन होमगार्ड विभागा मध्ये खुप मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे होमगार्ड चे खूप मोठे खच्ची करण झाले आहे. शासनाने होमगार्डला जाचक अटी लावुन त्यांना अपात्र केले. त्यामुळे होमगार्ड विभागामध्ये असंतोष पसरला होता. काही नेते मंडळींनी आपापल्या स्तरावर होमगार्ड चा लढा लढविण्याचे कार्य हाती घेतले होते. कुठे यश आले तर कुठे अपयश आले परंतु सामाजिक कार्यकर्ते. समाज सेवक लोहार समाज संघटक माणिकरावजी भंडगे यांनी होमगार्ड च्या विविध अडचणी जाणुन घेऊन शासन दरबारी नेऊन अडचणी चे निवारण करण्याचे ठरविले व पाठपुरावा करून काही अडचणी सोडवल्या गेल्या तर काही अडचणी प्रलंबित आहेत यापैकी अतिशय जाचक अट म्हणजे होमगार्ड महिला. पुरुष यांना ५० वय वर्ष असणाऱ्या सैनिकांना धावण्याची अट घालुन दिली होती. ती अट अजितदादा पवार साहेब यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते . लोहार समाज संघटक होमगार्ड च्या हितासाठी निस्वार्थपणे झटणारे . माणिक रावजी भंडगे यांच्या पाठपुराव्या मुळे रद्द झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड बंधु- भगिनी यांना नवचैतन्य मिळाले वयाच्या ५० व्या वर्षी धावणे शक्य नसल्यामुळे काही होमगार्ड सैनिक अपात्र ठरले होते व हतबल झाले होते. नवीनच रुजु झालेले महासमादेशक उपाध्याय यांच्या निदर्शनास हि बाब आणुन दिली . व होमगार्ड मुंबई महासमादेशक यांनी योग्य निर्णय घेऊन दि. ९ फेब्रुवारी . २० २२ रोजी उपमहासमादेशक यांचे धावणे ची अट रद्द झाल्याचे पत्र प्राप्त झाले यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील होमगार्डस् यांना दिलासा मिळाला. तसेच आणखी काही प्रलंबित जाचक अटी मार्गी लावण्यासाठी टिम कार्य करत आहेत. माणिकरावजी भंडगे यांनी महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड बंधू- भगिनी यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे असल्याचे सांगीतले आहे. कोणतेही धरणे. उपोषणे. आंदोलने. मोर्चे. न काढता होमगार्ड च्या हितासाठी निस्वार्थी पणे झरणारे माणिकरावजी भंडगे यांच्यासह रणरागिनी श्रीमती नंदाताई मोहिते व श्रीमती सुनिता ताई भोसले. माजी समादेशक दिपक कांबळे यांची टीम. यांनी अथक परिश्रम घेतले. व तसेच अकोला जिल्ह्यातील समादेशक तथा महिला पत्रकार संगिता इंगळे यांचे सुद्धा सहकार्य लाभले. धावण्याची अट रद्द केल्याबद्दल महाराष्ट्रा मध्ये ४५ हजार कार्यरत असलेले महिला पुरुष होमगार्ड माणिकरावजी भंडगे साहेब यांचे आभार व्यक्त करत आहेत.

About The Author