पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी – पाशाभाई पटेल

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी - पाशाभाई पटेल

अहमदपूर (गोविंद काळे) : तापमान वाढ हा जागतीक स्तरावरील एक गंभीर विषय बनला असून सबंध मानवजातीवर एक गंभीर संकट म्हणून हा प्रश्न जगापुढे आला आहे.यावर पर्याय म्हणून आजच सजग होवून पर्यावरण संतूलनासाठी बांबू लागवड करावी असे अवाहन शेतकरी नेते तथा कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले. येथील तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्ना संबंधाने आयोजित धरणे निदर्शने अंदोलन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी माजी मंत्री विनायकराव पाटील हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार बब्रूवान खंदाडे, अनूसूचीत जाती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव भालेराव,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाक्के, किसानमोर्चा चे सरचिटणीस दिलीपराव देशमुख,जि.प.सदस्य अशोकराव केंद्रे, अशोकराव चिंते,आर.डी.शेळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की,जगातील 198 देशांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येवून एक अहवाल सादर केला आहे.जागतीक तपमान वाढीमुळे जगाच्या समुद्रकिनाऱ्यावरील मोठमोठी शहरे ही पाण्याखाली जाणार आहेत.डिझेल पेट्रोल च्या अतीवापरामूळे कार्बनचे प्रमाण वाढत आहे.पृथ्वीच्या पोटात असलेले सूप्त स्वरूपात असलेले कार्बन मानवी गरजेपोटी सातत्याने उपसा केले जात आहे.अडीचहजार वर्षापूर्वी हवेतील कार्बन 280पीपीएम होता आत्ता 422 पीपीएम आहे.ज्या दिवशी हे प्रमाण 422 होईल त्या दिवशी पृथ्वीचा विनाश अटळ आहे.मोदी सरकारने 2017 साली बांबू हे झाड नसून गवत आहे असे जाहीर केले असून बांबूचे फायदे हळू हळू समाजापूढे येत आहेत.बांबू पासून इथेनाॅलची निर्मिती होत आहे.ऊसा पे॓क्षा बांबू पासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निघते त्यामुळे भविष्यात ऊस शेतीपेक्षा बांबू शेतीकडे शेतकर्‍यांनी वळावे.यात शेतकऱ्यांचे,पर्यावरणाचे पर्यायाने देशाचे हित जोपासले जाणार आहे.या साठी मोदी सरकारने बांबू लागवडी संदर्भात मोठ्या प्रमाणात अनूदान, योजना चालू केल्या आहेत याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.तसेच सध्या साखर कारखान्याच्या दूर्लक्षामूळे शेतकर्‍यांचा ऊस गाळपाअभावी उभा आहे.या उभ्या शिल्लक ऊसाला सरकारने पैसे द्यावे.भविष्यात बांबू शेतीच शेतकर्‍यांना तारू शकते आणि बांबू शेतीच देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचे काम करेल असा विश्वास त्यांनी बोलुन दाखविला. या प्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवून शेतकर्यांना मार्गदर्शक केले.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा उपस्थित होता.

About The Author

error: Content is protected !!