छत्रपती शिवरायांनी स्वत:चे नव्हे तर रयतेचे राज्य निर्माण केले..!
ह.भ.प.वनिताताई पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवरायांनी स्वत:साठी नव्हे तर रयतेसाठीच रयतेचे राज्य निर्माण केले असे प्रतिपादन शिरुर ताजबंद ह.भ.प.वनिताताई पाटील यांनी आपल्या कीर्तनात सांगीतले. तालूक्यातील शिरूरताजबंद येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलताना पाटील ताई म्हणाल्या की, शिवरायांनी आयुष्यात अनेक लढाया केल्या त्या कांही कोण्या जाती धर्मा विरोधात नव्हत्या तर जनतेला त्रासातून बेबंदशाहीतून मुक्त करण्यासाठी लढाया केल्या .छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात लढाईसाठी किंवा शुभ कार्यासाठी केंहाही मुहुर्त पाहीला नाही.स्वराज्य निमिर्तीसाठी अनेक जाती धर्मातील विश्वासू मावळ्यांना एकत्रीत करुन स्वराज्याची संकल्पना पटवुन दिली. त्याच प्रमाणे शिरर ताजबंद येथे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद भोसले यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्रीत करुन यशस्वीरित्या शिवजयंती उत्साहात साजरी केली. अनेक किल्यांची निर्मिती केली परंतू एकाही किल्याला स्वत:चे किंवा कुटुंबियांचै नाव दिले नाही यातून शिवरायांची उदारता दिसून येते. ह.भ.प.वनिताताई पाटील शिवजयंती कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सर्वजण एकत्र येऊन व ग्रामस्थांनी प्रयत्नातून साजरी करण्यात आली. ह.भ.प.सौ.वनिताताई पाटील. यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन भोसले परिवार यांच्याकडून करण्यात आले होते; यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लातूर जिल्ह्याचे खा.सुधाकर श्रंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, सरपंच बालाजी सारोळे, चेअरमन तुळशीराम भोसले, प्रशांत पाटील, निळकंठ पाटील,रामभाऊ बेलाळे, ॲड संतोष माने,गोविंद गिरी उत्तमराव पाटील, बालाजी जवळगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवानंद भोसले, महेश बिल्लापट्टे, गणेश कापसे, रणधीर पाटील, प्रताप पाटील, जयवंत सगर, दिलीप पाटील, अल्लाउद्दीन किनिवले मारोती मोरे, गजेंद्र वलसे, संजय वाघमारे, ज्ञानोबा मंतलवाड,बबन मलफेतवार, मच्छिंद्र कांडनगिरे, हणमंत बडगिरे, मुन्ना शेख, मोहन वलसे, एन.टी.बिराजदार, सत्यवान भोसले,अंतेश्वर वलसे,गोविंद गिरी, रवी स्वामी, दत्ता कोंडलवाडे, विठ्ठल सारोळे, विरभद्र भुरे, बालाजी वाघमारे, रमेश कौरवार, रवी दावणगावे, दिलीप मोरे, मोहन पाटील, नागनाथ बलशेटवार, भोसले उद्धव, रामकिसन पडोळे, डोंगरे दादा, नागेश शिंदे, नामदेव श्रीमंगले, शादुल शेख, राजे अंबादास, सोयल शेख, गंगाराम शिंदे, यशवंत कांबळे, लक्ष्मण गवळी, नवनाथ वाघमारे, विक्रम भोसले ; यांच्यासह आदि मान्यवर व शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.