नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी येथे हरिनाम सप्त्याचे औचित्य साधून “स्पर्श ” द इम्फाटिक टच सेवा भावी संस्था, नागझरी, मिरागी नेत्रालय अहमदपूर व लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विध्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रकिर्या शिबीर आयोजन करण्यात आले होते. 120 नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली त्यापैकी तब्बल 29 जणांना मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेचि आवश्यकता आहे असे डॉक्टराणी सांगितलें. या सर्व पेशंट ची मोफत शस्त्रक्रिया 03 मार्च 2022 रोजी नांदेड येथे करण्यात येणार आहे. संस्थे मार्फत प्रवास व चस्मा मोफत दिला जाणार आहे. सर्व डोळ्याच्या रुग्णांना डोळ्याच्या ड्रॉप देण्यात आले. ज्यांना जास्त त्रास आहे त्यांना मंगळवारी अहमदपूर येथे पुढील उपचारासाठी बोलावले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच रामकिशन सूर्यवंशी, प्रमुख उपस्तीथी ऍड देविदास इप्पर, माझी सरपंच प्रलाद इप्पर, बालाजी इप्पर (मंदिर संस्थानचे सचिव), गोपाळ अलापुरे, मारुती इप्पर, नाथराव इप्पर हे होते, कार्यक्रमाचे आयोजन गावचे उपसरपंच व संस्थेचे सचिव उद्धव इप्पर यांनी केले. डोळ्याची तपासणी डॉ गजानना माने व डॉ क्षीरसागर यांनी केली तर कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!