सिद्धी शुगरने कार्यक्षेत्रातील त्वरित ऊस गाळप करावा अन्यथा तिव्र आंदोलन करु – माजी मंत्री विनायकराव पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर तालुक्यात ऊस शेतामध्येच उभा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.उजणा येथील सिद्धी शुगर कारखान्याणे कार्यक्षेत्रा बाहेरचा ऊस गाळप केल्याने अहमदपूर व चाकुर तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस जशास तसा शिल्लक असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.सिद्धी शुगरने कार्यक्षेत्रातील ऊस तात्काळ गाळप नाही केल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी धरणे आंदोलनात दिला.
अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर अहमदपूर व चाकुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या काही ज्वलंत मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी माजी आमदार पाशा पटेल यांनी बांबू शेती फायदेशीर असून उपस्थित शेतकऱ्यांना बांबू शेती करण्याचा मौलिक सल्ला दिला.यावेळी अनेक मान्यवरांनी धरणे आंदोलनात विचार मांडल्या नंतर उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला पंधरा महिने होऊन गेले आहे,ऊस तसाच शेतात वाळत आहे त्याचे गाळप त्वरित करावे, तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरचा ऊस गाळप करत आहे तरी कार्यक्षेत्रातील ऊस गाळप त्वरित करावे, सिद्धी शुगरने कारखाना चालू झाल्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या एफ आर पी ची फरकाची रक्कम अद्याप दिली नाही.ती व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. हरीण, डुक्कर,मोर या वण्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई देऊन त्या वण्य प्राण्यांना अभय अरण्यात सोडण्यात यावे., अहमदपूर, चाकुर, जळकोट तालुक्यातील 132,220,133 के.व्ही.सबस्टेशन उच्च दाब वाहीनीच्या तारा खालील जमिनीचा मावेजा शासनाच्या प्रचलित दरपत्रकाच्या पाच पट देण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत सरकारचे सहकार तथा गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी लातूर, प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड यांना दिले आहे.
सदरील धरणे आंदोलनात माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार सुधाकर भालेराव , आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराज देशमुख,जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव केंद्रे, उपसभापती अशोक चिंते, माजी सभापती राघवेंद्र शेळके, कमलाकर पाटील, निळकंठ पाटील, राजकुमार खंदाडे, अमित रेड्डी, रामभाऊ बेल्लाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे, शिवराज पाटील, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी , राजकुमार पाटील, बालाजी गुट्टे ,माणीक नरवटे, देविदास सुरणर, विक्रम भोसले, प्रताप पाटील, बालाजी मुंडे, संतोष कोटलवार, तुकाराम हारगिले,शुकुर जागीरदार, चंद्रजीत पाटील, भगवान साळुंखे, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, किशोर कोरे, गजेंद्र वलसे, रणधीर पाटील, कमलाकर शेकापुरे, इंद्रजित माने, व्यंकट पाटील, अशोक कासले, हणमंत बडगिरे, निळकंठ हांबीर,सुखदेव कदम,केला कांबळे, संग्राम नरवटे, प्रशांत जाभाडे, बाळू चामे, माधव देवकते यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनाचे सुत्रसंचलन व आभार गोविंद गिरी यांनी मानले.