देव दगडात नाही तर माणसातच आहे हे तत्व सांगणारा संत म्हणजे गाडगेबाबा – बाळासाहेब पाटोदे

देव दगडात नाही तर माणसातच आहे हे तत्व सांगणारा संत म्हणजे गाडगेबाबा - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची 146 चा वी जयंती साजरी करताना त्यांचा संदेश सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. देव हा दगडात नसून माणसात आहे. हे तत्त्व सांगून माणसाला माणूस म्हणून ओळखा, अशी शिकवण देणारे संत गाडगे महाराज हे निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दुःखी, उपेक्षित माणसाच्या सेवेसाठी अर्पण केले. माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा अशा भावनेने त्यांनी काम केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. असे मत उदगीर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले.

ते राष्ट्रसंत ज्येष्ठ समाजसुधारक गाडगेबाबा महाराज चौकात आयोजित जयंती महोत्सव समितीच्या प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी सतीश पाटील मानकीकर, माजी नगरसेवक तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश आश्टुरे, नवज्योत शिंदे, संजय राठोड, धोबी समाजाचे युवा नेते अमोल गाजरे, संतोष गाजरे, महादेव गाजरे, रवी देगलूरे, विजय तेलंगे, पप्पू शेळके, वैभव कासराळी, विनोद तेलंगे, विशाल शेळके, दिलीप तेलंगे, बालाजी भालेराव यांच्यासह उदगीर येथील ख्यातनाम डॉक्टर तथा प्रबोधनकार, कीर्तनकार डॉक्टर शरदकुमार तेलगाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पटोडदे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाते. कारण स्वतः गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्याचे कार्य केले होते. त्यांचा आदर्श आपण घेऊन आपला परिसर नेहमी स्वच्छ केला पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. असे विचार सांगितले. याप्रसंगी इतरही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

About The Author