छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिराळा येथे भव्य व्यसनमुक्ती व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिराळा येथे भव्य व्यसनमुक्ती व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त निरोगी शरीर हाच खरा दागिना या म्हणीप्रमाणे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर विभागाच्या वतीने शिराळा गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच सीताराम काळे यांच्या हस्ते श्री च्या प्रतिमेचे पूजन करून व्यसनमुक्ती व आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली.यामध्ये ब्लडप्रेशर, ऑक्सिजन, तपासणी, मूळव्याध,आम्लपित्त,गुडघे व मान पाठ दुखणे, मुतखडा, त्वचारोग,शुगर स्त्रियांचे रोग, पांढरे चट्टे, स्नायू वेदना, दारू सोडवणे आशा विविध प्रकारच्या आजारावर गावातील व गावा शेजारील तब्बल 100 लोकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून या शिबिराचा लाभ घेण्यात आला.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मुख्यसंघटक ज्ञानेश्वर दादा काळे,लातूर जिल्हा समन्वयक राहुल मोहिते-पाटील जिल्हा प्रवक्ते कल्याण देशमुख,गावातील नागरिक कस्तुरे साहेब, शेख साहेब, डॉ. श्रवण शिंदे, सुरेश चव्हाण, सुधाकर नाना काळे, अच्युत बापू काळे, अनिल काटे, संदीपान काळे, अरुण पारवे, धनंजय जाधव, बालू जाधव व प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली काळे, लक्ष्मण आतकरे,रायबा लोभे, खंडू पवार, लक्ष्मण इंगळे, श्रीकांत देशमुख, राहुल गव्हाणे, नितीन शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author