मदन बोडके यांची संभाजी सेनेच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
किनगांव ( गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते मदन पंडीतराव बोडके पाटिल यांची नुकतीच संभाजी सेनेच्या लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली मदन बोडके यांना निवड पञ शुभहस्ते देताना संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने ,प्रदेश प्रवक्ते भानुदास बिरादार ,संभाजी सेना नेते धर्मराज पवार,जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे,उपाध्यक्ष शशिकांत माने,विद्यार्थी आघाडीचे जिल्हा संघटक प्रसाद पवार,तालुका उपाध्यक्ष बबलू चव्हाण, शहर अध्यक्ष अमोल कांदे उपस्थीत होते या निवडी बदल्ल प्रशांत बुलबुले, अमोल बुचडे, राहुल श्रीरामे, संतोष शिंदे सिद्धेश्वर गरड पंडीतराव बोडके ,मधुकर सुर्यवंशी, प्रा बालाजी आचार्य यांनी अभिनंदन केले.