अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांच्‍या राजीनाम्‍यासाठी लातूरात भाजपाची निदर्शने

अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांच्‍या राजीनाम्‍यासाठी लातूरात भाजपाची निदर्शने

मुख्‍यमंत्र्यांनी तात्‍काळ नवाब मलिक यांना बडतर्फ करावे- आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : देशद्रोही असलेल्‍या दाऊद इब्राहिम यांच्‍या नातेवाईकाशी आर्थिक हीत जोपासून जमीनीचा व्‍यवहार केल्‍याने राज्‍याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉण्‍डरिंग प्रकरणी ईडीने अटक करून कस्‍टडी घेतली. हा संपुर्ण प्रकार अत्‍यंत गंभीर असल्‍याने मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी देश विघातक कृत्‍यास हातभार लावणाऱ्या नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातून तात्‍काळ बडतर्फ करावे अशी मागणी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केली आहे.

अंडरवर्ल्‍डशी संबंधीत व्‍यक्‍तीसोबत जमीनीचा व्‍यवहार केल्‍याने राज्‍याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांना काल बुधवारी ईडी पथकाने तब्‍बल आठ तास चौकशी करून अटक केली व कस्‍टडी घेतली. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून अटक झालेली व्‍यक्‍ती मंत्रीपदावर राहणे दुर्दैवी असल्‍याने नवाब मलिक यांनी आपल्‍या मंत्रीपदाचा तात्‍काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड आणि शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली लातूर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्‍यात आला. त्‍यानंतर मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या मार्फत मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना आपल्‍या मागण्‍याचे निवेदन देण्‍यात आले.

नवाब मलिक यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, महावसुली राज्‍य सरकारचा धिक्‍कार असो, राजीनामा द्या राजीनामा द्या नवाब मलिक राजीनामा द्या, भाजपाचा विजय असो अशा विविध घोषणा देवून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर कार्यकर्त्‍यांनी दणानूण सोडला होता. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्‍यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजयुमोच्‍या प्रदेश प्रवक्‍त्‍या प्रा. प्रेरणा होनराव, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस विक्रम शिंदे, शहर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, दिग्‍वीजय काथवटे, रागीनी यादव, सतिष अंबेकर, साहेबराव मुळे, मिनाताई भोसले, अनिल भिसे, अनंत चव्‍हाण, गोविंद नरहरे, बन्‍सी भिसे, शिवाजी बैनगिरे, शाहूराज थिटे, शंकर रोडगे, ज्‍योतीराम चिवडे, सुरेश राठोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

नवाब मलिक यांना झालेली अटक राजकीय द्वेशातून नव्‍हे तर कायदेशीर झाली असून शरद पवार यांच्‍यासह महाविकास आघाडीतील तीन्‍ही पक्षाची मंडळी नवाब मलिक यांना पाठीशी घालण्‍याचे काम करीत आहेत हे दुर्दैवी असून नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्‍ब स्‍फोटातील व्‍यक्‍तीकडून जमीन खरेदी करून धहशतवाद्याला पोषक असे काम केले आहे. शिवसेना प्रमुख स्‍व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्‍वाभिमान आणि रक्‍त असेल तर उध्‍दव ठाकरे यांनी ताबडतोब नवाब मलिक यांची तात्‍काळ हाकालपट्टी करावी अशी मागणी करून आ. रमेशअप्‍पा कराड यांनी नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातून तात्‍काळ बडतर्फ नाही केल्‍यास येत्‍या काळात भाजपाच्‍या वतीने तीव्र स्‍वरूपात आंदोलन करण्‍यात येईल असा इशारा यावेळी बोलताना दिला.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपाच्‍या साडेतीन नेत्‍यांची नावे जाहिर करण्‍याची घोषणा केली मात्र प्रत्‍यक्ष पत्रकार परिषदेत एकाही भाजपा नेत्‍याचे नाव जाहीर करू शकले नाहीत. उलट पत्रकारांच्‍या प्रश्‍नांनी त्‍यांना घाम फुटला. अनिल देशमुख, नवाब मलिक जेल मध्‍ये गेले येत्‍या काळात राज्‍य सरकारमधील अनेकजण जेलमध्‍ये गेल्‍याशिवाय राहणार नाहीत. आज कांही जात्‍यात तर कांहीजण सुपात आहेत. भ्रष्‍टाचारा विरूध्‍दची कार्यवाही नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्‍याने होत आहे असेही आ. रमेशअप्‍पा कराड यांनी बोलून दाखविले.

या निदर्शने आंदोलनात विजय काळे, वसंत करमुडे, गोपाळ पाटील, सुरज शिंदे, काशिनाथ ढगे, प्रदिप मोरे, अनंत कोरे, विपुल गोजमगुंडे, रवि सुडे, किशोर जैन, शिवसिंह सिसोदिया, महेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, प्रताप पाटील, विजय चव्‍हाण, दत्‍ता सरवदे, महेश गाडे, धनराज शिंदे, विश्‍वास कावळे, शंकर चव्‍हाण, विनायक मगर, हरीकृष्‍ण गुर्ले, पांडूरंग बालवाड, गोपाळ शेंडगे, श्रीराम कुलकर्णी, दिगंबर माने, संजय गिर, गणेश गोजमगुंडे, श्रीमंत शिंदे, समाधान कदम, किशोर काटे, ज्ञानेश्‍वर जूगल, गोविंद मुंडे, किरण मुंडे, रमेश चव्‍हाण, सुरेश पाटील, सोमनाथ पावले, महादेव मुळे, मारूती गालफाडे, गोपाळ पवार, लक्ष्‍मण नागीमे, पद्माकर होळकर, वैजनाथ लवटे, गोविंद नांदे, चंद्रकांत वांगस्‍कर, इश्‍वर बुलबुले, शोभा कोंडेकर, प्रगती डोळसे, रत्‍नमाला घोडके, ज्‍योती रसाळ, पुनम पांचाळ, हणमंत कतलाकुटे, प्रशांत शिंदे, धनंजय जाधव, सुरेश पाटील, शिवराज फपागिरे यांच्‍यासह अनेकांची उपस्थिती होती.

About The Author