साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेच्या नामफलकाचे अनावरण संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर साकारण्यात येणाऱ्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजीत पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण नगरसेवक संतोषभाऊ शेप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे गटनेते राहुल शिवपूजे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून सामाजीक कार्यकर्ते अण्णाराव सूर्यवंशी, रिपाई जिल्हाध्यक्ष दिगंबरराव गायकवाड, गफारखान पठाण, प्रहारचे युवा तालूकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, समितीचे जगदिश वाघमारे, पत्रकार धम्मानंद कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रिपाई तालूकाध्यक्ष जीवनराव गायकवाड यांनी केले.तर प्रास्तविक यूवकनेते तथा स्मारक संस्थेचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मोठ्या अडचणीच्या शर्यती पार करत गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या एक एक परवानग्या ताब्यात घेत असून,नगर पालीकेच्या अध्यक्षा,उपाध्यक्षा,सभापती तथा सर्व नगर सेवकांच्या सहकार्याने शहरातील पालिकेची अतिशय महत्वाची जागा पुतळा उभारणीस मिळाली असून पालिकेने संस्थेस पुतळा उभारणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र सूध्दा दिलेले आहे.लवकरच शासनाची सूध्दा मान्यता घेवून सर्वांना सोबत घेवून अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करणार असून या पवित्र कामात अडचण न करता सहकार्य करावे असे अवाहन त्यांनी केले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश वाघमारे यांनी बोलताना नगरपालिकेने मोठ्या मनाने पुतळ्यासाठी जागा दिल्याने व निधीची तरतूद केल्याने समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले. तर अण्णाराव सूर्यवंशी यांनी बोलताना सांगीतले की,पुतळा उभारणीचे काम हे ऐतिहासिक असून या कामासाठी समाजबांधव खंबीरपणे पाठीमागे असल्याचे सांगीतले. यावेळी दिगंबरराव गायकवाड,जीवनराव गायकवाड यांची सूध्दा समायोचीत भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी समितीचे मूकूंद वाघमारे, राजेंद्र मेकाले,बालाजी शिंदे,देविदास वाघमारे, दत्ताभाऊ शिंदे, परमेश्वर कांबळे,अजय भालेराव, राजू कांबळे,विष्णु सूर्यवंशी,रामदास आवळे, दामोदर संमूखराव,नितीन डावरे, सिध्देश्वर गायकवाड,पांडूरंग डावरे, बाबा डावरे,रमाकांत हिरवे आदींनी पुढाकार घेतला.