विनायकराव पाटील यांनी मतदार संघातील ऊसाची चिंता करू नये – आ. बाबासाहेब पाटील

विनायकराव पाटील यांनी मतदार संघातील ऊसाची चिंता करू नये - आ. बाबासाहेब पाटील

चापोली (गोविंद काळे) : माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी मतदारसंघातल्या ऊसाची चिंता करू नये मतदारसंघातला ऊस हा सिद्धी शुगर साखर कारखानाच नेणार आहे व शेतकऱ्यांत हरितक्रांती निर्माण करणार आहे असे प्रतिपादन चाकूर अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिनांक 23 रोजी मुळकी तालुका अहमदपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात केले . . मुळकी तालुका अहमदपूर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 49 लाखाचे ऊस कर्जवाटप व पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणाचा शुभारंभ चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन , लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते . व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून चेअरमन विजयकुमार लोहारे होते .

यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, अण्णाराव सुर्यवंशी, श्री रामदास देशमुख अतुल देशमुख सरपंच प्रतिनिधी जयराम पाटील नाना जगताप उपसरपंच मुरलीधर सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की आज जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्यामुळे ऊस नेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तरीही आपण आपल्या मतदारसंघातील उसाला प्राधान्य देणार आहोत त्यामुळे उसाची चिंता विनायकराव पाटलांनी करू नये शेतकऱ्यांचा ऊस मीच नेणार आहे व मीच त्यांना चांगला दर देऊन त्यांच्या जीवनात हरितक्रांती आणणार असल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी नवनिर्वाचित विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विजयकुमार लोहारे, व्हाईस चेअरमन शिवाजीराव सूर्यवंशी, संचालक उमाकांत सूर्यवंशी, बबनराव शिंदे, बालाजी सूर्यवंशी, माधव दादाराव सूर्यवंशी, तानाजी दामोदर सूर्यवंशी, शिवानंद प्रल्हाद दांडगे, ज्ञानेश्वर वामनराव शिंदे , पार्वतीबाई किशनराव लोहारे, राजाराम सोपान मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गणपत बळीराम सूर्यवंशी, साहेब किशनराव शिंदे, विनायक विठ्ठल सूर्यवंशी , शिवशंकर वैजनाथ सूर्यवंशी, माधव राम सूर्यवंशी, वैजनाथ निवृत्ती सूर्यवंशी, नरसिंग अंबेगावे, माधव दादाराव सूर्यवंशी, दुर्गा शिवशंकर सूर्यवंशी, व्यंकट भुजंग सूर्यवंशी, जयश्री व्यंकट सूर्यवंशी या शेतकरी सभासदांना कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी मा. उपसरपंच मुरलीधरराव सूर्यवंशी, माजी सरपंच माधवआप्पा लोहारे, संगमेश्वर लोहारे, प्रल्हाद दांडगे , शुभम लोहारे, बाबुराव मुंडे, अशोक मुंडे, मधुकर लोहारे, अंबादास सूर्यवंशी, माधव भाऊराव सूर्यवंशी, आनंदराव शिंदे, राजू अंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश स्वामी यांनी केले . ..

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!