नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी युवक आघाडीच्यावतीने निषेध

महागाव (प्रतिनिधी) : नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यभरातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून त्याच अनुषंगाने महागाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि.२४) रोजी तहसीलदार महागाव यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध राज्याचे अल्पसंख्याक मंत्री ना.नवाब मलिक हे आवाज उठवीत होते. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय (ई.डी)चा गैरवापर करून व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत त्यांना अटक केली असून, संविधानानुसार भाजप सत्तेचा वापर न करता सूडबुद्धीने व दमणकारी राजकारण करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करीत असून ह्या दडपशाहीयुक्त आशा ना.मलिक यांच्या अटकेचा निवेदनाद्वारे निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष प्रवीण ठाकरे, युवक ता.अध्यक्ष हंसराज मोरे,पंजाबराव पाटील,राष्ट्रवादी महिला ता.अध्यक्ष सौ सुरेखा नरवाडे,राष्ट्रवादी युवक आघाडीचे राम जाधव, महागाव शहर अध्यक्ष स्वप्नील अडकीने,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड,राष्ट्रवादी ता.कार्याध्यक्ष वसंतराव जाधव,प्रवीण राठोड,हेमराज राठोड, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आदीब खान,अनिस शेख,सोहेल चव्हाण, शंकर कोपनर,विश्वजित अडकीने,शिवाजी नरवाडेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व महिलासेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!