होमगार्ड जवानांनी घेतली महासमादेशक भूषण कुमार उपाध्याय यांची भेट!

होमगार्ड जवानांनी घेतली महासमादेशक भूषण कुमार उपाध्याय यांची भेट!

मुंबई (प्रतिनिधी) : होमगार्ड जवानांच्या विविध मागण्यासदर्भात मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी होमगार्ड महासमादेशक भूषण कुमार उपाध्याय यांची पात्र व अपात्र होमगार्ड व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव भडांगे यांनी भेट घेतली. या भेटीत विविध महत्वाच्या विषयांनवर चर्चा झाली असे समजते. कमरबंद ऐवजी लेदर बेल्ट वापरण्यास परवानगी द्यावी. आर्म बॅच गोल ऐवजी पूर्वी प्रमाणे पोलीसांस सारखा असावा. महीलांनसाठी साडी घालणे सोयीस्कर वाटणाऱ्यांसाठी ती घालण्यास परवानगी द्यावी. पूर्वी प्रमाणे तीस होमगार्डच्या संख्येवर ऐक पर्यवेक्षण अधिकारी( व्यवस्थापन म्हणुन) देणे बाबत द्यावा. तत्कालीन उप महासमादेशक प्रशांत बोरुडे यांनी आरोपी पेशी करतांना जर होमगार्डला काही बरे वाईट झाले तर विमा लागु होणार नाही व त्यास सानुग्राह रक्कम मिळणार नाही असे परिपत्रक काढले होते ते रद्द करून या पुढे सदर पेशी दरम्यान दुर्घटना झाली तर त्याला ती रक्कम मिळावी. होमगार्डना जवानांना त्याच्या इच्छे नुसार इतर जिल्हा अंतर्गत बदली देण्यात यावी. पथक/ परिमंडळ कार्यालय चालु करणे. होमगार्ड ना जवळच्या पोलीस ठाण्यास कर्तव्यासाठी नेमणुक द्यावी.( उदा. ठाणे पथकाचे होमगार्ड हे वसई पोलीस ठाण्यास नियुक्त केले असून त्यांना चक्क भिवंडी. कल्याण डोंबिवली व ठाणे वरून दादरला यावे लागते तसेच पुन्हा दादर वरून वेस्टर्न मार्गे वसईला म्हणजे च प्रवासात त्यांचे जवळ जवळ साडेतीन – चार तास वाया जातात) तशीच अडचण रायगड युनिट ची देखिल आहे. अपात्र होमगार्डना संघटनेत परत घेणे. पोलीस संघर्ष समिती अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी होमगार्ड महासमादेशक भूषण कुमार उपाध्याय. सामाजिक कार्यकर्ते माणिकराव भंडगे व दिपक कांबळे यांचा करोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

About The Author