कोयत्याचा धाक दाखवून व्यक्तीला लुटले

कोयत्याचा धाक दाखवून व्यक्तीला लुटले

पिंपरी (रफिक शेख) : पाचजणांनी कोयत्याचा धाक दाखवून एका व्यक्तीला लुटले. त्यानंतर चारचाकी वाहन आणि रुग्णवाहिकेची तोडफोड केली. दापोडी येथे मंगळवारी (दि. २२) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. विल्यम अँड्रयूज गजभीव (वय ५२, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुमेध उर्फ गोट्या लहू गायकवाड, हृषीकेश शिंदे, वाजीद शेख, बंडा बलसुरे, अनिकेत ऊर्फ बॉक्सी शिरीष पठारे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून शिवीगाळ केली. जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील पैशाचे पाकीट व त्यातील १ हजार १९९ रुपये, आधारकार्ड काढून घेतले.

About The Author

error: Content is protected !!