पुण्यात चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला

पुण्यात चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला

पोलिसांकडूनही गोळीबार

पुणे (प्रकाश इगवे) : घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक करून कोयता फेकून मारत हल्ला केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या दिशेने हवेत गोळीबार केला. ही घटना सातारा रोडवरील सिटी प्राईड मागील चाफळकर कॉलनीमधील सोनिया अपार्टमेंटमध्ये पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.

पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोनिया अपार्टमेंटमध्ये ३ चोरटे शिरले होते. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील घराचा कोयंडा तोडला. त्याचा आवाज ऐकून सुरक्षारक्षकाने चेअरमनला फोन करून माहिती दिली. त्यांनी ११२ वर कॉल केला.

पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले की, आम्ही वखार महामंडळ येथे असताना कंट्रोलवरून कॉल आला. यावेळी बीट मार्शल दीपक मोघे, भीमराव कांबळे, उत्तम शिंदे आणि इलियास सय्यद यांना सांगून तेथे बोलावून घेतले. तेथील सुरक्षारक्षकाने चोरटे वर असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना आम्ही पोलीस आहोत, तुम्ही खाली या, असा आवाज दिला. त्यांनी दगड विटांचा वर्षाव केला. तेव्हा आम्ही गेटजवळ थांबलो. हे पाहून चोरटे भिंतीच्या दिशेने पळू लागले. आम्ही त्यांचा पाठलाग करू लागलो. ‘एकाने कोयता फेकून मारला.

About The Author

error: Content is protected !!