दैवीशक्तीच्या माथेफिरूने आणला पोलिसांना घाम

दैवीशक्तीच्या माथेफिरूने आणला पोलिसांना घाम

पुणे (रफिक शेख) : रात्रीच्या सुमारास नियंत्रण कक्षाचा फोन खणखणतो, राजभवन व यशदा येथे बॉम्ब असल्याचे फोन करणारा सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची तयारी सुरू असतानाच या कॉलमुळे सर्व यंत्रणा सतर्क होतात. बॉम्बशोधक व नाशक पथक रात्री संपूर्ण परिसर धुंडाळतात. त्याचवेळी दुसरीकडे फोन करणाऱ्याला पकडण्यात येते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर आपल्यात दैवी शक्ती असल्याने बॉम्बची माहिती मिळते, असे तो सांगतो. ते ऐकून पोलीस निःश्वास सोडतात. शुक्रवारी रात्री ११ वा. हा प्रकार घडला होता. नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर राजभवन व यशदाच्या सर्व परिसरात शोध घेतला. पण काहीही मिळाले नाही.

About The Author

error: Content is protected !!