ग्लॅममोंन मिस इंडिया सौदर्यवती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संस्कृतीचे सादरीकरण

ग्लॅममोंन मिस इंडिया सौदर्यवती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संस्कृतीचे सादरीकरण
ग्लॅममोंन मिस इंडिया सौदर्यवती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संस्कृतीचे सादरीकरण

पुणे (केशव नवले) : गोवा येथे ग्लॅममोंन मिस आणि मिसेस इंडिया सौदर्यवती स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत देशभरातून 50 पेक्षा अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. पुन्हा एकदा या स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारत आपले स्थान राखून टेवले आहे.

यात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या स्पर्धकानी नॅशनल राऊंड मध्ये भक्तिशक्ती चे सादरीकरण केले.
रोशनी पवार मुबई हिने शक्तीच्या रुपात आई जिजाऊसाहेब यांचे सादरीकरण तर प्रज्ञा शिंदे पुणे हिने भक्ति च्या रुपात वारकरी संप्रदायामधील वारीतील तुळशी वृंदावन घेऊन भक्ती करणारी महिला रूप सादर करत अभंग गायले व रॅम्प वॉक केला. या सादरीकरणाला प्रेषकाकडून भरभरून दाद देण्यात आली.

या स्पर्धेमध्ये मुबईतील लिषा कुंभार हिने झीरो साइज रनर अप मध्ये बाजी मारली. गेल्यावर्षी या स्पर्धेमधून महाराष्ट्र पोलिस जालना दामिनी पथकातील पी एस आय पल्लवी जाधव या रनर अप ठरल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी अभिनेता अमन वर्मा यांनी केले.

About The Author