अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई

अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई

पिंपरी (रफिक शेख) : शहराच्या हद्दीत अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली. शहरात छत्तीसगडच्या एका अभिनेत्री कडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २३) ताथवडे येथील एका लॉजवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.

कारवाईत अभिनेत्री आणि दोन महिलांची सुटका केली आहे. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय ४८, रा. वाघोली. मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), बंधू साहू (वय ३२ रा. वाघोली. मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपूर), पंगातीरा डिंगालाल परांगजाल (रा. उडिसा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून मोबाइलवरून व्हाट्स अॅप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताथवडे येथील लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारून कारवाई केली.

About The Author