महिलेनेच केला महिलेवर हल्ला

महिलेनेच केला महिलेवर हल्ला

पिंपरी (प्रकाश इगवे) : एक महिलेनेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पुनावळे येथे गुरुवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता घडली आहे. एका महिलेने एका अनोळखी महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी शेतात शेत काम करीत होती. दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला शेतात आली. तिने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारून महिलेला जखमी केले. गळ्यातील माळ ओढून तोडण्याचा प्रयत्न केला.

About The Author

error: Content is protected !!