जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला – अँड प्रमोद जाधव
जानवळ शाखेत बिन व्याजी ११ लाख रुपये कर्ज वितरण
चाकुर (प्रतिनिधी) : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असून जिल्हा बँकेने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले असून भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा बँक आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी येथे बोलताना दिली ते शुक्रवारी चाकुर तालुक्यातील जानवळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेच्या वतीने शून्य दराने ३६ लाख रुपये सभासदांना कर्ज मंजुर करण्यात आले प्राथमिक स्वरूपात ११ लाख आज पिक कर्ज वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे चाकुर येथील संचालक एन आर पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेसाहेब पाटील व्यासपीठावर अतिथी म्हणून सरपंच भागवत कूसंगे, बँकेचे माध्यम समन्वयक हारिराम कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हा बँक बचत गटांना कर्ज देणार – संचालक एन आर पाटील
जिल्हा बँक शेतकरी सभासद याना शून्य टक्के दराने पिक कर्ज वाटप करत शैक्षणीक, शुभमंगल योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे त्याच बरोबर ग्रामीण भागातील महीला बचत गटांना कर्ज देत असून यासाठी सरपंच चेअरमन यांनी पुढाकार घ्यावा महीला बचत गटांना कर्ज देता येईल त्या स्वतः च्या पायावर उभा टाकतील अशा अनेक ठिकाणी महिला बचत गटांना बँकेने सहकार्य केले आहे अनेक ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधत सक्षमपणे उधोग चालवत आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी अशोक नागिमे, जनार्दन खलंग्रे, बळीराम खसे, बळीराम साके, अरविंद साबदे, लालासाहेब धोंडगे, पद्माकर मुरकुटे, बुडे, रामजी केंद्रे, वसंतराव ढोबळे, विजयकुमार सोळंके, राजेश भताने, अंकुश गोमचाळे आदी सोसायटीचे चेअरमन, शेतकरी सभासद, बँकेचे ग्राहक उपस्थित होते.