३८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

३८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

पुणे (रफिक शेख) : न्यायालयातील सर्व केसेस चालवून न्याय मिळवून देतो, असे आमिष दाखवून वकिलांनी ३८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३८ वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. नंदकुमार डिकोजी पाटील (वय ६४, रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. २०१३पासून आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे पटत नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून त्या एकाकी राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कोर्टातील सगळ्याच केस चालवितो व न्याय मिळवून देतो, असे आमिष फिर्यादीला दाखवले. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

About The Author

error: Content is protected !!