बंद घर फोडून दोन तोळे सोने लंपास

बंद घर फोडून दोन तोळे सोने लंपास

पुणे (प्रकाश इगवे) : तुकाई दर्शन सासवड रोड येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. यात ५५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद्र बडगुजर यांचे बंद घर पाहून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!