वेश्या व्यावसायिकांवर सांगवी पोलिसांची कारवाई

वेश्या व्यावसायिकांवर सांगवी पोलिसांची कारवाई

पिंपरी (रफिक शेख) : वेश्या व्यावसायिकांवर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गोल्डन स्पा अॅण्ड ब्युटी, ब्लॉक सेक्टर, गोविंद पॅलेस शेजारी, कृष्णा चौकाजवळ नवी सांगवी येथे गुरुवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलीस प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्पा सेंटर मालक दिगंबर प्रल्हाद कदम (वय २५, रा. कृष्णा चौकाजवळ, नवी सांगवी, मूळ रा. सरम, ता. हिमायतनगर, जि. नांदेड), मॅनेजर समाधान पंढरीनाथ पाटील (वय २६, रा. नवी सांगवी. मूळ रा. खलाणे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कृष्णा चौकाजवळ नवी सांगवी येथे एका फ्लॅटमध्ये गोल्ड हेल्थ स्पा नावाने स्पा सेंटर चालू केले. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने तेथे ठेवले व त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. कारवाईत स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

About The Author