फोटोचा गैरवापर करून महिलेचा विनयभंग

फोटोचा गैरवापर करून महिलेचा विनयभंग

पिंपरी (प्रकाश इगवे) : महिलेच्या फोटोचा गैरवापर करून विनयभंग केला. ही घटना २२ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान बावधन येथे घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ९८३६०३२१९, ७५६८०२५७७, ७३०५४७६९८३ या क्रमांकावरील व्यक्ती आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून कर्ज घेतले होते. त्यानंतर ते कर्ज त्यांनी व्याजासहित परत केले. त्यांनतर स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशनच्या तीन मोबाइल नंबरच्या व्यक्तींनी आणि फिर्यादी महिलेच्या चेहऱ्याचा वापर करून त्यांचा अश्लील फोटो तयार केला. हा फोटो त्यांच्या मोबाइल नंबरवर पाठवून त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठविला. त्याचबरोबर फिर्यादी यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्डचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ देखील फिर्यादीच्या नातेवाइकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला.

About The Author

error: Content is protected !!