बँकेचा मॅनेजर सांगून ७४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक

बँकेचा मॅनेजर सांगून ७४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक

पिंपरी (प्रकाश इगवे) : बँकेचा मॅनेजर बोलत असल्याची बतावणी केली. तसेच क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करून एका व्यक्तीची ७४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. बिजलीनगर, चिंचवड येथे २८ ऑक्टोबर २०२१ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली. बालाजी त्रिंबक गाडले (वय ४१, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरी करतात. फिर्यादीला एका व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो आयसीआयसीआय बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून व प्रोटेक्शन प्लॅन बंद करून देतो, असे सांगितले. फिर्यादीच्या फोनवर आलेल्या मेसेजमधील ओटीपी नंबर देण्यास भाग पाडून फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून ७४ हजार ९९९ रुपये काढून फसवणूक केली.

About The Author

error: Content is protected !!