मतदारांची उदासीनता हुकुमशाही जन्माला घालते – डॉ .कारीकंटे

मतदारांची उदासीनता हुकुमशाही जन्माला घालते - डॉ .कारीकंटे

अहमदपूर ( गोविंद काळे ) : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी निर्भीड व निष्पक्ष पद्धतीने मतदान करणे आवश्यक आहे. जर मतदारांमध्ये उदासीनता निर्माण झाली तर देश हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करतो असे प्रतिपादन देगलूर येथील वै . धुंडा महाराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . कारीकंटे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून आज दि . 25 जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिनाचे ‘ औचित्य साधून महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून मतदार जनजागृती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ .डी. डी. चौधरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ . कारीकंटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कोविड-19 च्या नियमांचे पालन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ .पांडुरंग चिलगर यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली . या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. कारीकंटे म्हणाले की, लोकशाही मजबुतीसाठी जनतेचा राजकीय सहभाग वाढणे गरजेचे आहे. निर्भिड व निष्पक्ष पद्धतीने मतदान केले तर देशात चांगला रक्षक निवडला जाईल असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ . डी.डी .चौधरी यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ . प्रकाश चौकटे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ . बब्रुवान मोरे यांनी मानले . या कार्यक्रमास आभासी तथा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author