एस. जी. एस टेलिकॉम लिमिटेड कंपनीला साडेचार कोटींची फसवणूक

एस. जी. एस टेलिकॉम लिमिटेड कंपनीला साडेचार कोटींची फसवणूक

पिंपरी (रफिक शेख) : कंपनीकडे येणारी कामे स्वतःच्या कंपनीकडे वळवून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी फेज वन येथील एस. जी. एस टेलिकॉम लिमिटेड कंपनीत घडली. त्यात कंपनीची एकूण साडेचार कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणी वामन नारायण वाघ(वय ४२, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय सुरेश बारी (वय ३४, रा. ताथवडे), दिनेश शर्मा (रा. नवी मुंबई), अरुण कुमार के. एन. (रा. श्रीगंधनगर, बेंगलोर), प्रियांका संजय बारी (रा. जळगाव), गणेश विठ्ठल पाटील (रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय बारी, अरुण कुमार, दिनेश शर्मा हे फिर्यादी यांच्या कंपनीत विविध पदांवर काम करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या व नातेवाइकांच्या नावे जळगाव आणि अमेरिका येथे दुसरी कंपनी स्थापन केली. फिर्यादी यांच्या कंपनीकडे येणारी कामे आरोपींनी स्वतःच्या कंपनीकडे वळवली.

About The Author