विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

पिंपरी (प्रकाश इगवे) : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २८ मार्च २०११ ते जुलै २०१९ दरम्यान दत्तनगर, चोविसावाडी, चोली येथे घडला. याप्रकरणी २८ वर्षीय विवाहितेने वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती लहू रामा वाघमारे, दीर राजू रामा वाघमारे, जाऊ ‘उज्वला राजू वाघमारे (सर्व रा. जाधववाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, फ्लॅटचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच आरोपी पतीने घटस्फोट झाला नसताना असतानाही दुसरे लग्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author