बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला बारचा परवाना
पिंपरी (रफिक शेख) : बनावट कागदपत्रांच्या आधारे परमिट रूम व बारचा परवाना मिळवला. या प्रकरणी बाप-लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आला आहे याप्रकरणी किशोर रामचंद्र पंजाबी (४७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेश उर्फ नानिक रामचंद्र पंजाबी (वय ५६), मनीष नानिक पंजाबी (३२, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना नरेश याने त्याच्या वडिलांनी केलेले कुलमुखत्यार – पत्र रद्द झाले असतानाही ते योग्य असल्याचे भासवले. त्याआधारे दुय्यम निबंधक कार्यालय हवेली येथे एकाशी दोन वर्षाचा भाडेकरार केला. तसेच, आरोपी मनीष याने बनावट बांधकाम परवाना, नकाशा आणि इतर बनावट कागदपत्र देऊन राज्य उत्पादन शुल्क यांचेकडून हॉटेल ‘किचन १४३’ या “नावाने परमिट रूम व बारचा परवाना मंजूर करून घेतला, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.