चौदा लाख लंपास करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

चौदा लाख लंपास करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे (रफिक शेख) : सिंहगड रोडवरील ढमढेरे गॅस एजन्सीचे मालक स्वप्नील सुहास ढमढेरे यांनी त्यांचा कामगार गजेसिंह उम्मेद सिंह राठोड (वय २६,, धंदा गॅस मेकॅनिक, अप्पर गल्ली नं. ६, बिबवेवाडी) याला मुख्य ऑफिसमध्ये जमा झालेली दोन ते तीन दिवसांची जमा रोख रक्कम १४ लाख १३ हजार १६० रुपये ही बँकेत भरण्यासाठी दिली असता ती बँकेत जमा न करता परस्पर पैसे घेऊन फरार झाला.

आरोपी हा गुन्हा करून राजस्थान पळून गेला होता परंतु मित्रांना भेटून परत राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत लक्ष्मीनारायण चौक होल्गा हॉटेलजवळ कोणाची तरी वाट बघत थांबला आहे, अशी बातमी पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व राहुल ओलेकर यांना मिळाल्याने त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.

About The Author