मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना “ग्रेट इंडियन” पुरस्काराने सन्मानित

मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना “ग्रेट इंडियन” पुरस्काराने सन्मानित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “ग्रेट इंडियन” हा पुरस्कार पद्मभूषण उदित नारायण (प्रसिद्ध गायक) आणि माज़ी ख़ासदार डॉ उदित राज यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
16 व्या लोकसभेत उत्तम कामगिरी करून लातूर लोकसभा मतदार संघात अनेक विकासाची कामे आणि समाजातल्या शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळेल असे अनेक कामे माज़ी ख़ासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी केले आहेत.प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा सेंटर,लातूर शहरात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,पासपोर्ट कार्यालय,पोस्ट विभागाचे विभागीय कार्यालय ,पूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघात बीएसएनएल चे 4g नेटवर्क चे जाळे,रत्नागिरी ते नागपूर हायवेची लोकसभेत मागणी,टेंभुर्णी लातूर स्टेट हायवे ला नॅशनल हायवे करून काम सुरू करण्याची मागणी . लातूरला रेल्वेने पाणी आनने,लातूरला रेल्वे बोगीचा कारखाना सुरु केले,केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेतून एक लाखापेक्षा जास्त लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅस कनेक्शन मिळऊन दिले, जिल्ह्यामध्ये जनधन बैंक खाते जास्तीत जास्त लोकाना उघडून देन्याचे काम केले.आणि विशेष म्हणजे खासदार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची दिशा कमिटी ची नियमित बैठक घेणारे देशातले एकमेव खासदार असी नोंद असलेले,ज़िल्हा रस्ता सुरक्षा कमिटीची बैठकीची सुरुवात देशामध्ये सर्वप्रथम खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी केली आणि नियमित पाच वर्ष घेतली.लातूर आकाशवाणी साठी चा प्रयत्न आणि देशातील वेगवेगळ्या विषयावर ती जवळपास साडेसातशे प्रश्न लोकसभेत मांडून अनेक महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून एक उत्कृष्ट सांसद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहेच.राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय अनेक शांतता पुरस्कार मिळाले आहेत.यापूर्वी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे .असे आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन बुद्धांजलि आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनी संस्थेकडून माजी खासदार डॉक्टर उदित राज यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा , हा “ग्रेट इंडियन” पुरस्कार मुंबई येथे प्रसिद्ध गायक,पद्मभूषण उदित नारायण आणि डॉक्टर उदित राज त्यांच्या पत्नी मदुराईच्या चीप इन्कम टॅक्स कमिशनर सीमा उदित राज,प्रसिद्ध सिने अभिनेत्री गायिका सलमा आगा ,यांच्या हस्ते माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना ग्रेट इंडियन अवार्ड देऊन गौरव करण्यात आला.
या अवार्ड कार्यक्रमाला बॉलिवूड मधील कलाकार सिनेअभिनेते अली खान प्रसिद्ध कॉमेडियन ऍक्टर सुनील पाल प्रसिद्ध प्रसिद्ध सिने अभिनेते फैजल खान आमिर खान यांचे बंधू बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नी ची भूमिका केलेली अभिनेत्री मल्होत्रा. उदा अंजलीचे पिंपळे कैलास मासूम आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना ग्रेट इंडियन या अवार्ड गौरव केल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवर आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!