‘वन फोर थ्री’ चित्रपटाचे दयानंद कला महाविद्यालयात प्रमोशन

'वन फोर थ्री' चित्रपटाचे दयानंद कला महाविद्यालयात प्रमोशन

‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’निर्मित ‘वन फोर थ्री’ चित्रपट 4 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

लातूर (प्रतिनिधी) : रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटही पुढे सरसावत आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येत ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित नवा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रमोशन दयानंद कला महाविद्यालय संपन्न झाले. दिग्दर्शक योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव,वृषभ शहा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड,पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे डॉ.संदीप जगदाळे,डॉ गोपाल बाहेती,प्रा.रविकिरण गळगे प्रा.महेश जंगापल्ले यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाचे विविध रंग मांडत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकी जबरा असा रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे देखील भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिने भरली मना मध्ये हे चित्रपटातील गाणे सुमधूर आवाजात रेकॅार्ड केले आले. तर चित्रपटातील ‘वाचू दे इष्काचा प्राण’ ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग ‘पडला खटका’ रेश्मा सोनावणे हिने शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात ‘धिंगाणा’ पार्टी सॉंग गायले आहे. नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. हे आपलं काळीज हाय या ‘वन फोर थ्री’ चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘वन फोर थ्री’ चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टिझरने, गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे, यांत शंकाच नाही. येत्या ४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!