कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने काम करावे – आ. रमेशअप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) : येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून भाजपा पुर्णपणे ताकतीने लढणार आहे. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने नव्या उमेदीने, जोमाने कामाला लागावे असे अवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.
जळकोट तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक लातूर येथे झाली. या बैठकीत आ. कराड बोलत होते. या बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, धर्मपाल देवशेट्टे, विश्वास चाटे, बालाजी केंद्रे, सत्यवान पाडे, बालाजी मालूसरे, बाळू नणंदकर, रत्नाकर केंद्रे, संतोष देशमुख, विश्वनाथ चाटे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत जळकोट तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुरेखा रावसाहेब आगलावे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर शैलेश नागसारवट, चंद्रकांत किडे, यशवंत बनसोडे, रोहीत भोसले, बालाजी हुडा, शंकर धोंडे, दिपक भोसले, पप्पू कमलापूरे, अमीत कांबळे यांच्यासह अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष आ. कराड म्हणाले की, भाजपा पक्ष कोणत्याही नेत्याचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या निवडणुकीत कसलीही तडजोड केली जाणार नाही. पक्षाला कोणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असे सांगून आ. कराड म्हणाले की, जे पक्षासोबत प्रामाणिकपणे निष्ठेने राहून काम करतात. त्या कार्यकर्त्यांची पक्षाकडून निश्चितच दखल घेतली जाते तेव्हा गट तट न पाहता कमळ हेच ध्येय डोळयासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे
जळकोट तालुका शतप्रतिशत भाजपाचा बालेकिल्ला होता. भाजपाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीत पराभव झाला त्याची अनेक कारणे आहेत. जे झाले ते झाले आता येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक सर्वांच्या समन्वयाने भाजपा ताकतीने लढणार असून सर्वाच्या सहमतीनेच उमेदवारी दिली जाईल कोणीही शंका घेण्याची गरज नाही असे आ. कराड यांनी बोलून दाखविले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून उज्वल गॅस, घरकूल, शेतकरी सन्मान योजना, मोफत रेशन यासह अनेक योजना सुरू केल्या. त्यांच्या हजारो, लाखो गरजूंना लाभ मिळाला. यासह विविध कामावची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहंचवावी असेही अवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी केले. या बैठकीत जळकोट तालुक्यातील भाजपाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत भाजपाला विजय कशा पध्दतीने मिळेल या दृष्टीने जिद्दीने काम करणार आहोत अशी ग्वाही दिली.