केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध!

केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध!

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेब पाटील आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात अहमदपूर तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ईडीची शिडी वापरून मोदी सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बऱ्याचवेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला, यातून त्यांच्या हाती काहीच लागले नाही हा पूर्वइतिहास असताना पुन्हा पुन्हा तीच रीघ ओढण्यामध्ये त्यांना काय आनंद होतो आहे देव जाणे. पुढे तरी या चुका वारंवार न करता थोडासा तरी शहाणपणा दाखवावा हीच केंद्राकडून देशाच्या राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या अनेकांना माफक अपेक्षा आहे. असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, जिल्हा काँग्रेस पार्टी सरचिटणीस सांबतात्या महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंतराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विलासराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, माजी सभापती चंद्रकांत मद्दे, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, महेश बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माधवराव जाधव, सिराज जहागीरदार, विकास महाजन, तुकाराम पाटील, शार्दुल पठाण, डी.के. जाधव, दिनकर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन, शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, तिरुपती पाटील, एन. डी राठोड, भगवान ससाने, जमीर सौदागर, ऍड. सादिक शेख, सचिन पडिले, गोपीनाथ जायभाये, श्‍याम देवकते, अशोक सोनकांबळे, सरस्वती कांबळे, सुवर्णा रोकडे, लता मदने, शकुंतला शेवाळे, शालूताई कांबळे, शेख महंमद, सुलताना शबाना कुरेशी, सीताबाई जाधव, मानसी हाके, सतीश नवटक्के, दिनकर कदम, मिरकले बळवंतराव, रविशंकर महाजन, मुजमिल सय्यद,गंगाधर ताडमे बाळासाहेब बेडदे, शिवाजीराव खांडेकर, जावेद बागवान, सय्यद सकर, अशिष पवळ, अनिल शेळके, अक्षय देशमुख, शिवा भारती, ससाने भगवान, लहू बारवाड, सुधाकर बलवाढ, सोमेश्वर कदम, एस.के जहागीरदार, तिरुपती पाटील, तुकाराम पाटील, सुभाष गुंडळे, संदीप शिंदे, श्याम देवकते, व्यंकट वंगे, सय्यद मुन्ना, इम्रोज पटगेवर, शेख सय्यद इलियास, अभय भिरकुले तसेच मा विकास आघाडीतील सर्व पदाधिकारी पक्षाचे नगरसेवक कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

About The Author