पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नाईकवाडे उपाध्यक्षपदी कळंबे यांची निवड

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नाईकवाडे उपाध्यक्षपदी कळंबे यांची निवड

पालम ( गोविंद काळे ) : येथील तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची दि. 26 रोजी मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार माधवराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते घेण्यात आलेल्या बैठकीत मारोती नाईकवाडे यांची तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्षपदी धोंडीराम कळंबे कार्याध्यक्षपदी शांतीलाल शर्मा सचिव पदी राहुल गायकवाड सहसचिव बाळकृष्ण चाळक संघटक राम बनसोडे सहसंघटन कल्याण शिरस्कर कोषाध्यक्ष आनंद साखला सहकोषाध्यक्ष चांद तांबोळी चिटणीस बि.एम फुलपगार सहचिटणीस अरुणा शर्मा.मर्गदर्शक माधवराव गायकवाड. लक्ष्‍मण दुधाटे.मोतीराम शिंदे. भगवान करंजे. शेख गौस. सदस्य संग्राम खेडकर. भरत जोगदंड. शरद पोले. विलास वाघमारे बाबासाहेब एंगडे. प्रल्हाद पांचाळ. भास्कर लांडे. संभाजी शिराळे .रूखमाजी गिणगिणे. आधीची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित कार्यकारिणीची भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे. लक्ष्मणराव रोकडे माजी सरपंच. मा नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव शिरस्कर. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुलाबराव शिरस्कर .आ. गुट्टे काका मित्रमंडळाचे भगवान सिरस्कर. सामाजिक कार्यकर्ते राम प्रसाद कदम.सामाजिक कार्यकर्ते विलास चव्हाण आदी कडून स्वागत करण्यात आले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!