दयानंद शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दयानंद शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेत कोविड 19 च्या धर्तीवर सर्व नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन केले. याप्रसंगी सुभाष एकतारे व श्रीमती ज्योती निमकर यांच्या सेवानिवृत्त निमित्य सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सरचिटणीस रमेश बियाणी, विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, धर्मवीर परांडेकर,ॲड माधव इंगळे, प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड , प्राचार्य डॉ श्रीराम सोळुंके, प्राचार्य डॉ पूनम नथानी, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ पटवारी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!