उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उदगीर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भरत राठोड, पोलीस निरीक्षक नारायण उबाळे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना परेड संचलन करण्यास परवानगी दिली. उदगीर तालुक्यातील सैनिकी शाळा, गृहरक्षक दल, पोलिस दल यांनी संचलनात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील व पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड यांचा सत्कार ही राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार यांची भेट घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता येलमेटे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी मानले.