जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणांत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. या ध्वजारोहण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे,उपजिल्हा निवडणूक डॉ.सुचिता शिंदे, उपजिल्हाधिकारी (सा) गणेश महाडीक,उपजिल्हाधिकारी (पूर्नवसन) जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. दुशिंग, तहसिलदार महेश परंडेकर, महेश सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते 8.20 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. या ध्वजारोहण कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के,राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक सुनील बारगजे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव,भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भा.ना. संगमवार, जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत, नायब तहसिलदार पी.डी.जाधव यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!